
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या रिटेवाडी उपसा सिंचन बाबत मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी आश्वासन दिले होते तरी तरी ते लवकर पुर्ण करावे याबाबतचे निवेदन लाभ क्षेत्रातील सर्व शेतकरी बांधवांनी मुख्यमंत्री, तहसीलदार यांना दिले आहे. आमच्या करमाळा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रातील खालील प्रमाणे येणारी गावे आहेत अंजनडोह, वीट, विहाळ, झरे, कोर्टी, रावगाव, पोंदवडी, लिंबेवाडी, बंजारवाडी मोरवड, पिंपळवाडी हिवरवाडी, रोसेवाडी, राजुरी, भोसे, वडगाव दक्षिण, उत्तर, पुनवर, पोथरे, निलज, कामोणे, खडकी, जातेगाव, मांगी, आळजापूर, सावडी, कुंभारगाव तसेच त्याखालील येणाऱ्या संपूर्ण वाड्या असे मिळून ३५ ते ४० गावे कुकडी लाभक्षेत्रामध्ये आहेत. परंतु आम्हाला कुकडीचे पाणी

कुठल्याच गावाला भेटत नाही व मिळत नाही. वर्षातून दोन ते तीन वेळा कसेबसे पाण्याचे आवर्तन सुटत आहे. परंतु ते पाणी आम्हा शेतकऱ्यांना टेल टू हेड असल्यामुळे कुकडे ते करमाळा २५० किलोमीटरचे अंतर असल्यामुळे पुर्ण दाबाने पाणी कधीच भेटत नाही. आत्तापर्यंत आमच्या शेतात पाण्याचा एक थेंबही आलेला नाही, त्याच्यामुळे आम्ही सतत हाल अपेष्टाचे जीवन जगत आहोत, तसेच सततच्या दुष्काळामध्ये होरपळत आहोत. आमच्या करमाळा तालुक्याची हेळसांड झालेले आहे. त्यामुळे आमच्या करमाळा तालुक्याला असणारे हक्काचे पाणी ६ टीमसी पाणीअसेल तेवढे ६ टीएमसी पाणी उजनी धरणात सोडून

आम्हाला रिटेवाडी उपसा सिंचन करुन आमचे हक्काचे पाणी मिळवून द्यावे ही आमची ३५ ते ४० गावची प्रमुख मागणी आहे. त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय उरलेला नाही. आम्ही सर्व शेतकरी बांधवांनी आमच्या ३५ ते ४० गावचे ग्रामपंचायतचे ठराव सोबत जोडलेले आहेत. आम्ही त्याच्यावरील स्वाक्षरी सह्या केलेल्या आहेत, म्हणून आम्हाला खात्री आहे की आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री कर्तव्यदक्ष आहेत हे आम्हाला कोणी सांगण्याची आवश्यकता नाही. कारण जे मुख्यमंत्री बोलतात जे शब्द देतात ते अगदी मनापासून तन-मन-धन लावून पूर्ण खेळ

जा.क्र./ २०२४देऊन काम करत आहेत हा अवघा महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहत आहे. इथे कोणाची सांगायची गरज नाही. मुख्यमंत्री आपण गेल्या वर्षी करमाळा तालुक्यामध्ये श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मुळी पुजन वेळी आपण अगदी मनापासून ठासून सांगीतले होते की रिटेवाडी उपसा सिंचन करून देणारच. हे आश्वासन आपण आदिनाथ महाराजांच्या साक्षीने कारखान्यावरती करमाळा वासियांना दिलेले आहे. त्या वेळेला आम्ही तुमच्याकडे आमच्या रिटेवाडी चा प्रश्न सोडवण्याचा आग्रह धरलेला होता व त्याची ठरावाच्या नकली सुद्धा तुमच्याकडे दिलेल्या आहेत. म्हणून आपण दिलेल्या वचनाची कसल्याही परिस्थितीत पूर्तता करावी आणि ती अपेक्षा आपण पूर्ण करतान अशी आम्हा सर्व शेतकरी बांधवांना शाश्वत आशा आहे. जी कामे येथून पाठीमागच्या काळामध्ये झाली नाहीत. ती कामे आपण धडाडीने निर्णय घेऊन सर्वांना समाधानी ठेवत आहात. म्हणून आपण आपल्या भाषणामधून सहजरित्या सांगत आहात की, हे सरकार सर्वसामान्य

माणसाचे आहे, शेतकऱ्यांचे आहे, गोरगरिबांचे आहे, त्यामुळे आमच्या करमाळा तालुक्याचा कायमचा दुष्काळ हटवण्याची ताकद ती तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे आमचा करमाळा तालुका कायम सुजलम सुफलम होईल व आमच्या गोरगरीब माणसांच्या डोळ्यातून येणारे अश्रू पुसून काढतान हे आम्हाला शंभर टक्के नाहीतर हजार टक्के अपेक्षा आहे. आमच्या भावना तुम्ही जाणून घेतान ही आमची मनापासून अपेक्षा आहे. तरी हे काम बऱ्याच दिवसापासून रेंगाळलेले आहे. ते काम कुठल्या स्टेजला आहे ते आम्हा शेतकऱ्यांना काहीही बिलकुल सांगता येत नाही, तरी आपण हे काम रिटेवाडी उपसा सिंचन ची मंजुरी तात्काळ कॅबिनेटची मंजुरी घेऊन तात्काळ सुरू करण्यात यावे ही आमची आपणाला व आपल्या सरकारला नतमस्तक होऊन आग्रहाची कळकळीची विनंती करत आहे आणि आपण ते करताल अशी अपेक्षा आहे. जर मंजुरी नाही मिळाली तर ३५ ते ४० गावांना वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल. ह्या कामाची तात्काळ मंजुरी नाही तर घेऊन दिली तर आम्ही सर्व शेतकरी बांधव व ग्रामस्थ येणाऱ्या सर्व लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकणार आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार, पोलीस निरीक्षक करमाळा यांना रेटेवाडी उपसा सिंचन समितीचे सदस्य सरपंच ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी दिले आहे.