
करमाळा प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठा महासंघ करमाळा तालुकाध्यक्षपदी “योगेश सुरेश राखुंडे” यांची निवड झाल्याबद्दल करमाळा काँग्रेस

आय पक्षाच्या वतीने प्रतापराव जगताप यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुजय जगताप, सचिन कटारिया, प्रतीक जगताप, नितीन चोपडे, बबलू चिंचकर, उत्तरेश्वर सावंत, नागेश कांबळे, अकबर तांबोळी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राखुंडे म्हणाले की माझे आजोबा बलभीम विष्णू राखुंडे यांच्याकडेही अनेक वर्ष मराठा महासंघाचे

तालुकाध्यक्ष पद होते. त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच मला होणार असून यापुढे समाजाचे संघटन करून समाजाच्या हिताचे निर्णय घेऊनच कामकाज करणार असल्याचेही राखुंडे यांनी सांगितले.

