करमाळा प्रतिनिधी

बहुजन मराठी पत्रकार संघ शाखा करमाळा यांच्या वतीने चला सयानों संस्कृती जपु.. रथ सप्तमीच्या मुहुर्तावर  हळदी कुंकू हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बहुजन मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा महिलाध्यक्षा आशाताई चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालविकास प्रकल्प विभाग करमाळा पर्यवेक्षीका आतकर मॅडम या होत्या. तर प्रमुख पाहुण्या उज्ज्वला लांडगे, प्रमुख उपस्थितीत महिला जिल्हाध्यक्षा आशाताई चांदणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला होता, या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन मराठी पत्रकार

संघाच्या करमाळा तालुका सचिव माधुरी कुंभार यांनी केले होते. या वेळी उपस्थित महिलांना आशाताई चांदणे यांनी मानसिक व शारीरिक गोष्टी सक्षम बनवणे काळाची गरज आहे. यावर मार्गदर्शन केले तसेच महिलांच्या अनेक समस्यांना कसे सामोरे जावे याविषयी आतकर मॅडम यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर महिलांच्या उखाणे स्पर्धा, संगित खुर्ची असे कार्यक्रम आयोजित करुन बक्षीस वितरण करण्यात आले.  या कार्यक्रमासाठी रुपाली महामुनी, सुवर्णा निंबाळकर, निर्मला देवकर,

आनंदी कदम यांनी सहकार्य केले. हा कार्यक्रम आदिनाथ साखर कारखाना ( भाळवणी ) येथे घेण्यात आला.  यावेळी उपस्थित बहुजन मराठी पत्रकार संघाच्या महिला जिल्हाध्यक्षा आशाताई चांदणे, बालविकास प्रकल्प विभाग पर्यवेक्षीका लोपमुद्रा आतकर मॅडम, उज्ज्वला लांडगे, बहुजन मराठी पत्रकार संघाच्या करमाळा सचिव माधुरीताई कुंभार, सुवर्णाताई निंबाळकर,

रुपाली महामुनी, निर्मला देवकर, आनंदी कदम व इतर महिला यांच्या उपस्थितीत आनंदी वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आशाताई चांदणे यांनी केले तर आभार माधुरीताई कुंभार यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *