करमाळा प्रतिनिधी

करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्याकडून कौतुकाची थाप, 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना नगरपालिकेचे ध्वजारोहण मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्या हस्ते झाले. नगरपरिषदेच्या ध्वजारोहन प्रसंगी नगरपालिका

मुला मुलींची शाळा नंबर 4 या शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत तबला पेटीच्या तालावर गायन केले व शाळेतील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी हर्षदा दीपक भोसले व स्वरांजली राजू वाघमारे या विद्यार्थिनींनी प्रजासत्ताक दिन व भारतीय

संविधान याबद्दल अतिशय उत्कृष्ट अशी भाषणे केली. त्यातून त्यांनी आपल्या संविधानाची माहिती दिल्या बद्दल करमाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे व न. प. शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी अनिलजी बनसोडे, केंद्र समन्वयक

दयानंद चौधरी सर, वरिष्ठ लिपिक शिवदास कोकाटे यांनी विशेष कौतुक केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कार्यक्रमाप्रसंगी अतिशय खडे आवाजामध्ये ऑर्डर देण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशालेचे मुख्याध्यापक विक्रम राऊत

सर यांनी केले. हार्मोनियम वादक मुकुंद मुसळे सर व तबला वादक सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर अब्दुले सर यांनी अतिशय सुरेल अशी साथ संगत दिली. कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला सतीश टांगडे मॅडम यांनी केले.

विद्यार्थिनींना भाषणांचे मार्गदर्शन आसराबाई भोसले, संतोष माने सर, बाळू दुधे सर यांनी केले. याप्रसंगी नगरपालिका शाळेतील सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक व नगरपालिकेतील सर्व शाळेतील विद्यार्थी नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *