
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायीनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे सन २०२३-२४ चे खरीप आवर्तन १३ दिवस व रब्बी आवर्तन १०३ दिवस असे तब्बल ११६ दिवस ही योजना चालविण्यामध्ये आ.संजयमामा शिंदे यांना यश आले असून ऐन दुष्काळात तालुक्याच्या पूर्व भागातील २४ गावातील केळी, ऊस आदी पिकांसह तरकारी पिकाला मोठे जीवदान मिळाले आहे.

यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये उजनी धरण अवघे ६०.६६ टक्के भरले असताना आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे २ ऑक्टोबर २०२३ पासून दहिगाव योजनेचे खरीप आवर्तन सुरू झाले त्याला जोडूनच सलग रब्बी आवर्तनही १५ ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आले. हे आवर्तन २५ जानेवारी २०२४ रोजी धरण वजा पातळीत गेल्यानंतर बंद करण्यात आले. धरण भरल्यानंतर प्रथम सुरू होणारी व सर्वात शेवटी बंद होणारी दहिगाव उपसा सिंचन ही योजना आहे.

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या सातत्यपूर्ण वाटचालीत आमदार शिंदे यांचे मोठे योगदान. सन २०२१ पासून दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी रु. ३.६९ प्रति युनिट व २०२२ नंतर रु. ५.२६ प्रति युनिट याप्रमाणे विद्युत देयेकाची आकारणी करण्यात येत होती त्यामुळे रु. ४.०० कोटी इतके विद्युत देयक पाणीपट्टी वसूलीअभावी थकीत असल्याने योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. तथापि आ.संजयमामा शिंदे अध्यक्ष असलेल्या विठ्ठल कार्पोरेशन लिमिटेड म्हैसगाव या कारखान्याने थकीत विज बिलाची हमी घेतल्याने विद्युत पुरवठा सुरु करण्यात आला.

दहिगाव योजनेसाठी सन २०२१ पासून रु ३.६९ प्रति युनिट व २०२२ नंतर रु.५.२६ प्रति युनिट याप्रमाणे विद्युत देयकाची आकारणी करण्यात येत होती. तथापि जास्तीच्या विद्युत बिलाचा बोजा शेतक-यावर येवू नये त्याकरिता आ. संजयमामा शिदे यांनी शासनाकडे उपसा सिंचन योजनांसाठी अल्प दरात वीज उपलब्ध व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केला. त्या प्रयत्नातून पूर्वलक्षी प्रभावाने शासन निर्णय क्र. संकिर्ण २०२१/प्र.क्र.११८/उर्जा-५ दि. २५/०८/२०२२ अन्वये वीज दर रु. १.१६ प्रति युनिट इतका करण्यात आल्याने शेतक-यावर वाढीव बोजा पडला नाही.

८० लाखापेक्षा अधिक पाणीपट्टी वसूल करून महामंडळाकडे भरली – (उपाभियंता एस. के. अवताडे, कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक १२)
दहिगाव उपसा सिंचन योजनेचे सुरुवातीच्या टप्प्यातील वीज बिल कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून आ. शिंदे यांच्या पाठपुराव्यातून भरले गेले, परंतु पुढील काळात शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी जमा करण्यासंदर्भात महामंडळाकडून सूचना करण्यात आल्या. त्यातूनच दहिगाव योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. सन २०२१-२२ मध्ये रु. १२.८६ लक्ष, सन २०२२-२३ मध्ये रु. ३५.६४ लक्ष व सन २०२३-२४ मध्ये आतापर्यंत रु ३५.१२ लक्ष इतकी पाणीपट्टी वसूल करून महामंडळाकडे भरणा करण्यात आली आहे.
दहिगाव उपसा सिंचन योजनेवरील उर्वरित काम बंद नलिकेतून होणार. दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी सन २०२३-२४ मध्ये रु. ४०.०० कोटी निधीची तरतूद करण्यात आली. त्यामधून प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे करण्याच्या कामाची रु. १०१.३४ कोटी किमतीची निविदा प्रसिद्ध होऊन “द इंडियन ह्युम पाईप कं. लि, मंबई” यांना सदर कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत.
सदर निविदे अंतर्गत प्रकल्पावरील २७ वितरिका व ९९ उपवितरिका, १९ थेट विमोचकाद्वारे प्रकल्पाचे एकूण लाभक्षेत्र १०८०४ हे. करीता बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बंद नलिका प्रणालीद्वारे पाणी देण्याचे नियोजन केल्याने ०.४६ अघफू (टिएमसी) एवढी बचत होत असून त्यामधन ३५००-४००० हे. वाढीव क्षेत्रास पाणी देणे शक्य होणार आहे.
सलग ६ वर्ष सातत्यपूर्ण चालत आहे – दहिगाव उपसा सिंचन योजना
योजनेचा आवर्तन कालावधी – २०१८-१९
खरिप
कालावधी दि २३/०८/२०१८ते दि. २२/१०/२०१८
एकूण – ६०दिवस
रब्बी
दि. ०६/१२/२०१८ ते दि. ०८/०१/२०१९ दि. ११/०२/२०१९ ते दि. २८/०२/२०१९
एकूण – ५१दिवस
उन्हाळी
दि. ०१/०३/२०१९ ते २१/०३/२०१९
एकूण -२० दिवस
२०१९-२०
खरिप
दि ०६/०८/२०१९ ते दि. १५/१०/२०१९
एकूण – ७१दिवस
रब्बी
दि. १६/१०/२०१९ ते दि. ३०/१०/२०१९ व दि. २०/१२/२०१९ ते दि. ३०/०१/२०२०
एकूण -५७ दिवस
उन्हाळी
दि. ०३/०४/२०२० ते २०/०५/२०२०
एकूण -४८ दिवस
२०२०-२१
खरिप
दि ०५१/०१/२०२० ते दि. १४/१०/२०२०
एकूण -४० दिवस
रब्बी
दि. २७/०१/२०२१ ते दि. २८/०२/२०२१
एकूण -३२ दिवस
उन्हाळी
दि. ०१/०३/२०२१ ते दि. ०५/०४/२०२१ व दि. ११/०४/२०२१ ते दि. १९/०५/२०२१
एकूण -७४ दिवस
२०२१-२२
खरिप
दि ०५/०८/२०२१ ते दि. १४/१०/२०२१
एकूण -७१ दिवस
रब्बी
दि. १५/१०/२०२१ ते दि. ११/११/२०२१ व दि. २०/०२/२०२२ ते दि. २८/०२/२०२२
एकूण -३७दिवस
उन्हाळी
दि. ०१/०३/२०२१ ते दि. १७/०६/२०२१
एकूण -१०९ दिवस
२०२२-२३
खरिप
दि ०२/०८/२०२२ ते दि. ०९/०९/२०२२ व दि. १५/०९/२०२२ ते दि. २५/०१/२०२२
एकूण -५० दिवस
रब्बी
दि. ०९/०१/२०२३ ते दि. २५/०२/२०२३
एकूण -४८ दिवस
उन्हाळी
दि. ०९/०३/२०२३ ते दि. १२/०५/२०२३
एकूण -६५ दिवस
२०२३-२४
खरिप
दि. ०२/१०/२०२३ ते दि. १४/१०/२०२३
एकूण -१३ दिवस
रब्बी
दि. १५/१०/२०२३ ते दि. २५/०१/२०२३
एकूण -१०३ दिवस