
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल येथे ध्वजारोहण उत्साहात साजरा
करमाळा प्रतिनिधी
श्री रामचंद्र बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था, करमाळा संचलित स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल येथे आज सकाळी प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष जयंत दळवी व पालक मान्यवर यांच्या हस्ते भारत

माता, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी या़च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते.नंतर सचिव तथा मुख्याध्यापिका धनश्री जयंत दळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ध्वजारोहण झाल्यानंतर आयुष जाधव, के.एन. शहा, राजवीर लावंडे, सिद्धी

जगताप, श्रावणी गोरे, प्रशिक कांबळे, हर्षदा बनकर, संविधान कांबळे, शुभम चव्हाण, साद घोडके, अनन्या कांबळे, स्वरा कांबळे, समृद्धी कांबळे, ओम हेळकर व मोहित या विद्यार्थ्यांनी भाषण केले. नंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला. ध्वजारोहण

यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी सहशिक्षिका शिवांगी कांबळे, शुभांगी खळदकर, अश्विनी महामुनी, रूपाली जगताप, त्रिवेणी शिंदे, अश्विनी पाटील, सविता पवार, अंजुम कांबळे, रोहिणी गरड, कृष्णा पवार, राहुल पलंगे या सर्व स्टाफ ने परिश्रम घेतले. सूत्रसंचालन खळदकर मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक व आभार कांबळे मॅडम यांनी मानले.

