
करमाळा प्रतिनिधी
केंद्र सरकार नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा सल्लागार समितीवर करमाळा येथील संतोष कांबळे यांची निवड केंद्रीय युवक व क्रीडा मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणाऱ्या नेहरू युवा संघटन योजनेच्या युवा केंद्र जिल्हा समितीवर सल्लागार म्हणून करमाळा

येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयं संघाचे संतोष कांबळे यांची निवड करण्यात आली. युवा केंद्र च्या माध्यमातून राबविण्यात येणारे युवकासाठी वेगवेगळ्या योजना व उपक्रम यासंबंधीतील जिल्ह्यातून वेगळा

क्षेत्रातून युवा नेतृत्वाची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये करमाळा येथील संतोष कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. संतोष कांबळे यांच्या निवडीमुळे युवा क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली असून ग्रामीण भागातील

चांगले व्यासपीठ उपलब्ध होऊ शकले आहे. निवडीनिमित्त संतोष कांबळे यांचा सत्कार राष्ट्रीय स्वयं संघाचे जेष्ठ कार्यकर्ते संजू घोरपडे व त्यांची बंधू राजू घोरपडे मराठा महासंघाचे अभिजीत सूर्यवंशी व विशाल कुंभार माजी जिल्हा उपाध्यक्ष धोबी

समाज सुनील सावरे सत्कार करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

