
करमाळा प्रतिनिधी
कोंढार चिंचोली ते डिकसळ जुन्या पुलाच्या दुरुस्तीच्या कामास त्वरित मंजूरी द्या व नवीन पुलाच्या पाईलिंगचे (कॉलम )चे काम त्वरित युद्धपातळीवर चालू करावे—- देविदास (आप्पा) साळुंके (मा. सरपंच व आर टी आय कार्यकर्ता कोंढार चिंचोली)

त्या संबधितीचे निवेदन त्यांनी शासनास केले सादर
कोंढार चिंचोली कर्तव्य दक्ष मा. सरपंच व आर टी आय कार्यकर्ते देविदास साळुंके यांनी त्या संबधितीचे निवेदन देऊन त्यांनी समक्ष सार्वजनिक बांधकामचे Assistant चीफ इंजिनिअर खलाटे व पुलाच्या कामाचे ठेकेदार राहुल पटेल यांच्याशी चर्चा केली व पुलाचे जुन्या / व नव्या पुलाच्या कामाचा आढावा घेतला असता त्या ठिकाणी पाठपुरावा घेऊन नवीन पुलाच्या पाईलीग च्या कामाची चीफ इंजिनिअर चव्हाण यांची शिफारस घेऊन पुणे येथील पुल डिझाईन यांची मंजुरी घेऊन सदर पाईललिंग

मंजुरीसाठी नवी मुंबई येथील चीफ इंजिनिअर रामगुडे कोकण भवन यांचे कार्यालयाकडे गेले असून सदर पुलाचे पाईललिंग च्या कामास 30 जानेवारी 2024 या 7 दिवसात मंजुरी मिळून पुलाचे कॉलम चालू करणेचे काम फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात चालू होत असल्याचे साळुंके यांनी स्पष्ट केले व त्यांनी त्यांच्या शासनास दिलेल्या निवेदनात पुढील माहिती सादर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे कि जुना रेल्वे पूल हा ब्रिटिशकालीन दगडी पूल असून भीमा नदीवर उजनी धरणाच्या फुगवट्यावर सन 1855 साली बांधण्यात आला असून, सदर पुलास 14.10 मिटरचे गाळे असून पुलाची लांबी 400

मिटर एवढी आहे. सदरच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात हलकी व जड वाहतूक होत असल्याने सदस्थितीत पूल धोकादायक बनला आहे. पुलाचे स्ट्रकचरल ऑडिट झाले असून अहवालानुसार दुरुस्तीसाठी अंडर वाटर इन्स्पेक्शन, दगडी बांधकामास टच पॉईंटींग करणे, जॉईंटचे रेकिंग करणे, ग्राऊंटिंग करणे, आपोक्सी ग्राऊंटिंग करणे, शिलिकॉन बेस वाटर रिपीलन्ट स्टोन सील करणे, विंगओल व पॅरापेट साठी दगडी बांधकाम करणे, वेअरिंग कोट साठी डी बी एम बीसी करणे जोडरस्त्यासाठी मेटल बीम क्रश ब्यरिअर बसविणे, तशेच पुलावरून जड वाहतूक बंद करणेसाठी हाईट गेज ब्यारिकेटस बसविणे इत्यादी बाबीचा दुरुस्तीसाठी समावेश करण्यात आलेला आहे. असं साळुंके यांनी विषद केले असून तेव्हा शासन स्थरावरून मंजुरी मिळणे

गरजेचे, आवश्यक आहे. त्यासाठी पूल दुरुस्ती कार्यक्रमातून मंजुरी प्राप्त होणेसाठीचा प्रस्ताव आर्थिक चित्रानासह व शिफारशीसह मा. मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे यांनी वरिष्ठ विभागाकडे पाठविलेला आहे. त्यास त्वरित मंजुरी दयावी व या भागातील प्रश्न मार्गी लावून नवीन पुलाचे काम प्रगती, मध्ये व्हावे कारण सध्या धरण पातळी ही खूप खाली गेली असून सध्या उजनी धरण वजा मध्ये असून काम करणेस 5 महिन्याचा काळ आहे तेव्हा याबाबत देविदास साळुंके यांनी शासनास निवेदन देऊन समक्ष असिस्टंट चीफ इंजिनियर खलाटे व ठेकेदार राहुल पटेल याची गाठ बेट घेऊन कामाचा आढावा घेतला असून सदर नवीन पुलाच्या पाईलिंग चे कामास 7 दिवसात मा. चीफ इंजिनियर रामगुडे पूल

डिझाईन नवी मुंबई यांची मंजुरी मिळून कॉलम चे काम हे फेब्रुवारी च्या पहिल्या साप्ताहत चालू होत असल्याचे देविदास साळुंके यांनी सांगितले असून लोकांनी सहकार्य करण्याचे आहवान केले आहे. तेव्हा या वर्षी काम बऱ्याच प्रमाणात होणार आहे तरी काळजी करू नये पुलासाठी शेवट पर्यंत अहोरात्र काम प्रामाणिकपणे करणार असल्याचे साळुंके यांनी सांगितले आहे.
