कंदर (प्रतिनिधी)

कंदर तालुका करमाळा येथील के. डी. एक्सपोर्टच्या कोल्डस्टोरेज पॅक हाऊस उद्घाटनानिमित्त कंदर येथे गुरुवारी २५ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन केळी पिकाविषयी परिसंवाद व तज्ञांचे मार्गदर्शनाचा

कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

गेल्या सोळा वर्षापासून केळी निर्यात क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण केलेल्या कंदर तालुका करमाळा येथील केळी निर्यातदार शेतकरी किरण डोके यांच्या के.डी एक्सपोर्टच्या वतीने अडीच हजार मे. टन. क्षमतेचे कॉल्ड स्टोरेज व आधुनिक पॅक हाऊस निर्मिती केली असून याचा शुभारंभ कार्यक्रम नॅचरल शुगर कळंब. जिल्हा धाराशिवचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे यांच्या हस्ते होणार

असून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू राजाराम देशमुख या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहाणार आहेत या शुभारंभ कार्यक्रमाच्या निमित्त केळी पिक संदर्भात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना नाशिकच्या सह्याद्री फार्मस्चे अध्यक्ष विलास शिंदे, माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट, कृषीरत्न आनंद

कोठडीया हे मार्गदर्शन करणार असून निर्यातक्षम केळी उत्पादक शेतकरी, केळी उत्पादक महिला शेतकरी, बेंबळे फार्मर्स प्रोडूसर कंपनी, लोकविकास डेअरी समूह, ज्योतिर्लिंग कृषी बचत गट कंदर, लोकविकास फार्मर प्रोड्युसर कंपनी शेटफळ, बनाना असोसिएशन,   बनाना बायर, केळी निर्यातदार, कंदर ग्रामस्थ व मित्र परिवार यांच्या पुढाकारातून यावेळी  जैन

इरिगेशनचे केळी पिक तज्ञ के.बी पाटील हे केळी पिकातील संधी याविषयी विचार व्यक्त करणार आहेत. या कार्यक्रमाला राज्य कृषी उत्पन्न विभागाचे उप.   सरव्यवस्थापक राजेंद्र महाजन,  माजी पणन संचालक सुनील पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसणे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक निर्यातदार शेतकरी किरण डोके व जैन इरिगेशनचे कृषीतज्ञ किरण पाटील यांनी दिली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *