नारीशक्तीचा मकर संक्रांतीनिमित्त कोर्टीगावात रोपे देऊन सन्मान
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर व ग्रामपंचायत कोर्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने व संस्थेचे सचिव विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी. पाटील सर, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक सर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आज कोर्टी

गावात मकर संक्रात एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी केली. कोर्टी गावच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच भाग्यश्री श्रीरंग मेहेर, उपसरपंच नानासाहेब प्रकाश झाकणे, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा जाधव, मंगल मेढे रोहिदास शिंदे, सचिन नवले ह.भ. प श्री.मंच्छिन्द्र अभंग, श्रीमंत झाकणे,ग्रामपंचायतचे सर्व माजी सरपंच व सदस्य व मोठ्या संख्येने महिला उपस्थित

होत्या. मकर संक्रातीच्या सणाचे औचित्य साधून हळदी कुंकू व तिळगुळाच्या कार्यक्रमानिमित्त सर्व महिलांना अंजीर, वड, उंबर, अशी झाडे देऊन सर्व महिलांचा सन्मान केला. सदर झाडांची रोपे दादाश्री फाउंडेशनचे काकासो काकडे यांच्या सहकार्याने ३५० व आयुषग्राम जिंती व शासकीय आयुर्वेद दवाखाना जिंती येथील आरोग्य अधिकारी बी. एल.गाढवे यांच्या सहकार्यांने २०० अंजीर रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच या कार्यक्रमावेळी महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडुन वाहत होता. यावेळी

गावच्या प्रथम नागरिक सरपंच भाग्यश्री मेहेर यांनी आपल्या भाषणात सर्व महिलांनी झाडांची काळजी घ्यावी,योग्य पद्धतीने संगोपन करावे असे सुचवले. तसेच यावेळी श्रीरंग मेहेर यांनी गावातील सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल. तसेच भविष्यात सर्व ग्रामस्थांना मुलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन दिले.तसेच रोहिदास शिंदे यांनी २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील उपक्रमांची माहिती दिली. तसेच शिबिरासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच शिबिराच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य

कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच जिल्ह्यातील अनेक अधिकारी गावाला भेट देणार आहेत. तसेच सर्व ग्रामस्थांनी आपल्या घरासमोरचा परिसर स्वच्छ व सुंदर बनवावा असे सुचवले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख यांनी केले तर आभार सचिन नवले यांनी मानले .


चौकट
कोर्टी गावच्या नवनिर्वाचित सरपंच भाग्यश्री मेहेर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना ज्या महिला रोपांचे चांगल्या पद्धतीने संगोपन करून वाढवतील अशा महिलांचा ग्रामपंचायतीच्या वतीने पुढील वर्षी मकर संक्रातीला सोन्याची नथ देऊन सन्मान केला जाईल असे जाहीर केले

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *