आदिनाथ कारखाना सहकारी ठेवून आवश्यक ते सहकार्य करणार – आ रणजितसिंह मोहिते पाटील
करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ कारखाना सहकारीच ठेवून त्याला आवश्यक ते सहकार्य करणार असे आश्वासन आ. रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांना दिली.


करमाळा तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांसह, सभासद शेतकऱ्यांनी शिवरत्न बंगल्यावर मोहिते पाटलांची भेट घेतली होती यावेळी ते बोलत होते.
या परिसरातील काही नेते हा कारखाना कधी विकायला निघतोय अन् आम्ही विकत घेतोय, यावर टपून बसले आहेत. पण हा कारखाना जिवंत राहावा, अशी आमची इच्छा असल्याचे विलास घुमरे यांनी सांगितले. तर यापुढे मोहिते पाटलांच्या

विचारांनेच हा कारखाना चालेल, असा शब्द बागल गटाकडून सर्वांना दिला. आदिनाथच्या बाबतीत आ. मोहिते-पाटील जो निर्णय घेतील त्याला आम्ही सर्वजण सहमती देऊ, असे माजी आ. नारायण पाटील यांनी सांगितले.


यावेळी धैर्यशील मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, सविताराजे भोसले, कन्हैयालाल देवी, धनंजय डोंगरे, डॉ. वसंत पुंडे, धुळाभाऊ कोकरे, दिनेश भांडवलकर, शिवाजी बंडगर, शहाजी देशमुख, अजित तळेकर यांच्यासह करमाळा तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, सभासद, शेतकरी उपस्थित होते.


…….
माझ्याकडे आदिनाथ होता जिल्ह्यात सर्वाधिक दर मी दिला होता पारदर्शक कारभार केला नंतर काहींनी आदिनाथ कारखान्याच्या वटवृक्षाची फळे, पाने, फांद्यासुद्धा त्या लोकांनी खाल्ल्या. आता फक्त खोड शिल्लक आहे.याला कारण कोण हे सर्वांना माहीत आहे भविष्यात असे होऊ नये – जयवंतराव जगताप माजी आमदार,करमाळा


……….
आदिनाथ कारखान्यावर राज्य बँकेचे 60 कोटी, एचसीडीसीचे 63 कोटी, कामगारांचे पगार 38 कोटी, प्रोव्हीडंड फंड पाच कोटी राज्य सरकार नाव कोटी आयसीआय बँक पाच कोटी चौदा पंधरा सालची तोडणी वाहतूक ९ कोटीएचसीडीसी चे 63 कोटी कामगारांचे पगार 38 कोटी प्रवीण फंड पाच कोटी राज्य सरकार नाव कोटी आयसीआय बँक 5 कोटी, १४-१५ सालची तोडणी वाहतूक ९ कोटी, 22-23 चे १ कोटी व इतर असे सुमारे 30 कोटी रुपयांचे कर्ज व देणी आहेत. यातील काही कोटींचे रक्कम भरायला मार्च 2024 पर्यंत ची मुदत आहे रक्कम नाही भरली तर राज्य बँक मार्चनंतर कारवाई करण्याची शक्यता आहे – आ. रणजीतसिंह मोहिते पाटील

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *