
करमाळा प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल वांगी नंबर तीन मध्ये नेहरू विज्ञान केंद्र मुंबई व शिवरत्न शिक्षण संस्था अकलूज यांच्या माध्यमातून” फिरते विज्ञान प्रदर्शन बस “आली होती. या बसमधील विज्ञान विषयक सर्व गोष्टीतून आरोग्य व

स्वच्छता या विषयी दैनंदिन जीवनात व नित्यक्रमात कशी काळजी घ्यावी. विज्ञानामुळे आपले जीवन सुकर व सुंदर करावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी हा घटक आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे याविषयी सविस्तर आणि प्रयोगातून, डिजिटल

पोस्टरच्या माध्यमातून अतिशय चांगली माहिती ग्रामीण भागातील विद्यालयामध्ये देऊन विज्ञान पोहोचवण्याचे काम नेहरू विज्ञान केंद्र समन्वयक देवानंद भुसने, तंत्रज्ञ शरीफ तोडावी, प्रणित धावडे व कृष्णा जगताप हे करीत आहेत, असे गौरव द्वार प्रशालेचे मुख्याध्यापक संजय पानसरे यांनी याप्रसंगी काढले.

सुरुवातीस विद्यालयात नेहरू विज्ञान केंद्र मुंबई फिरते विज्ञान प्रदर्शन बसचे सर्वांच्या वतीने स्वागत करण्यात आले. या नंतर वर्गांनुसार सर्व विदयार्थ्यांना या बसमधील प्रदर्शनाविषयी माहिती देण्यात आली. या प्रदर्शनाचा सर्व विद्यार्थ्यांनी अगदी मनापासून आनंद आणि लाभ घेतला.

प्रशालेतील सहशिक्षक महादेव पवार या उपक्रमाविषयी बोलताना म्हणाले की, नेहरू विज्ञान केंद्र मुंबई व शिवरत्न शिक्षण संस्था अकलूज यांनी ग्रामीण भागातील शाळांसाठी व मुलांसाठी राबविलेला नवोपक्रम काळाची गरज ओळखून राबविलेला एक आदर्श उपक्रम व स्तुत्य उपक्रम आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील अतुल खूपसे, प्रशांत देवकर, विश्वनाथ सुरवसे, विक्रम होनपारखे, प्रमिला होनपारखे, अमरदीप वारे, मंगेश देशमुख या सर्व शिक्षक सेवकांचे व सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

