
प्लॅटची खरेदी न दिल्यास २६ जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदन गणेश हरिदास कोकाटे यांनी तहसीलदार करमाळा यांना दिले आहे.
करमाळा प्रतिनिधी
मी गणेश हरिदास कोकाटे शिशिर बिल्डिंग नं. ३, मधील प्लॅट नं. ३०२ येथील रहिवाशी असून सदर प्लॅट बंधन बँकेचे गृह कर्ज रू. १७,००,०००/- (अक्षरी – सतरा लाख रूपये) व डाऊन पेमेंटची रक्कम ४,५०,०००/- (अक्षरी चार लाख पन्नास हजार) रू. अशी

पूर्ण प्लॅटची किंमत २१,००,०००/- लाख रूपये किंमत ठरलेली असताना दिनेश घोलप यांची अडचण होती त्यामुळे त्यांनी उसणे ५०,०००/- रू. जास्त घेतले. अशी प्लॅटची संपूर्ण रक्कम दिलेली असताना देखील मला माऊली बिल्डकॉन पार्टनर दिनेश

देविदास घोलप यांनी फ्लॅटची खरेदी देतो माझ्या वडिलांच्या नावावर असलेली वडिलोपार्जित पुनवर हद्दीतील गट नं. १७३/५ ही जमीन महेश भोसले यांच्या नावावर सोनाई पतसंस्था इंदापूर यांच्या नावावर ८,००,०००/- कर्ज काढले त्याचा बोज्या

माझ्या वडिलोपार्जित जमीनीवर चढवला आहे. अशी माझ्या वडिलांची दारू पाजुन दिशाभूल करून फसवणूक केली आहे. तरी ही रक्कम दिनेश घोलप व महेश भोसले (मो. नं. ९८५०४९३००२) यांनी भरून माझ्या उताऱ्यावरील बोजा ८ दिवसाच्या आत

कमी करून द्यावा. दिनेश देविदास घोलप (मो.नं. ९८२२००१५६६). सुरेश लक्ष्मण घाडगे पाटील (मो.नं. ९४२३३२६७७३) हे सदर फ्लॅटची खरेदी देण्यास टाळाटाळ करत आहेत व दिनेश घोलप आररावीची भाषा करून तुला काय करायचे आहे ते कर ? असे

म्हणून मला मानसिक त्रास देत आहेत. तरी मला आठ दिवसात खरेदी द्यावी अन्यथा मी दि. २६/०१/२०२४ रोजी आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्यास परवानगी मिळावी असे निवेदन गणेश कोकाटे यांनी तहसीलदार यांना दिले आहे.

