मकाई संघर्ष समितीने जिल्हाधिकारी यांना एसटी आगाराच्या गलथान कारभारा विषयी निवेदन दिल्यानंतर करमाळा येथे बैठकीचे आयोजन… ॲड. राहुल सावंत

करमाळा प्रतिनिधी : – मकाई संघर्ष समितीने जिल्हाधिकारी यांना करमाळा आगाराच्या गलथान कारभारा विषयी दि. 1/1/2024 रोजी निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद साहेब यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 3/3/2024 रोजी जिल्हा एसटी आगार व्यवस्थापक यांच्या सोबत ॲड. राहुल सावंत, दशरथ आण्णा कांबळे, प्रा. रामदास झोळ सर, वामनदादा बदे, रवींद्र गोडगे, हरिदास मोरे, गणेश वाळूंजकर, शहाजी माने, बाळासाहेब गायकवाड यांची बैठक आयोजित केली

होती. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांना तशा सूचना देण्यात आल्या. त्यानुसार तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, ॲड. राहुल सावंत निमंत्रित सदस्य :- जिल्हा नियोजन समिती सोलापूर, अध्यक्ष दत्तकला शिक्षण संस्था प्रा.रामदास झोळ सर, अध्यक्ष शेतकरी संघटना रविंद्र गोडगे, यांच्या नेतृत्वाखाली दि. 5/1/2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गणेश वाळूंजकर, हरिदास मोरे, शहाजी माने, व सर्व पत्रकार विशाल घोलप,‌सुनिल भोसले, अशोक मुरूमकर, समाधान फरतडे, अश्पाक सय्यद, सिध्दार्थ वाघमारे, नाशीर कबीर, विशाल परदेशी, हर्षवर्धन गाडे, भालचंद्र गाडे, उपस्थित होते.


सुरुवातीला नादुरुस्त एसटी बसेसचा प्रश्न लावून पत्रकार यांनी एसटी करमाळा आगार व्यवस्थापक यांच्या गलथान कारभाराचा संपूर्ण मालिका सांगितल्यावर, मकाई संघर्ष समिती शिष्टमंडळ चांगलेच आक्रमक भूमिकेत आले. आणि करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांनी शांतपणे ऐकून घेऊन एसटी आगार व्यवस्थापक श्री. वीरेंद्र होनराव यांना चांगलेच धारेवर धरून लवकरात लवकर एसटी वाहतूक सुरळीत करण्याचे सक्तीचे आदेश दिले. ज्या सध्या परिस्थितीत चालू असणाऱ्या गाड्या तात्काळ कॅम्प लावून दुरूस्ती कराव्यात आणि प्रवाशांना चांगली सेवा द्यावी, बसेस वेळेवर सोडाव्यात,

मुलींचे पास प्रत्येक महिन्याला शाळेत जाऊन देण्यात यावेत, एसटी बस स्वच्छ असावी, करमाळा डेपो ची एसटी बस बाहेर गेले पासून परत डेपो त येईपर्यंत रोडवर बंद पडणार नाही याची काळजी घ्यावी, एसटी स्टँडवर व परिसरात स्वच्छता असावी, बंद ठिकाण च्या मुक्कामी एसटी बस त्वरित चालू कराव्यात आणि लवकरात लवकर एसटी वाहतूक सुरळीत करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *