करमाळा प्रतिनिधी

करमाळा- सेवानिवृत्त कृषी अधिकारी अविनाश थोरात यांच्या पत्नी प्रफुल्ललता अविनाश थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त यांनी वायफट खर्च टाळुन करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या श्रीकमलादेवी मंदीर जतन संवर्धन कामास रोख रूपये ११०००/- आकरा हजार रूपये देणगी देऊन आपला वाढदिवस आणखीन अस्मरणीय बनवला आहे.

श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्ट च्या संयोजनाने

श्री कमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या दोन महिन्यांपासून कामास सुरुवात करण्यात आली. असून ट्रस्ट चे  अध्यक्ष सोमनाथ चिवटे यांनी मदतीचे आवाहन भक्तांकडे केले असता भक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आज श्रीकमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास  

प्रफुल्ललता अविनाश थोरात यांनी देणगी दिली. यानिमित्त  त्यांचा सत्कार मंदिर समितीच्या वतीने करण्यात आला .मंदिर समितीचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील, विश्वस्त डॉक्टर प्रदीपकुमार जाधव पाटील, विश्वस्त डॉक्टर महेंद्र नगरे, विश्वस्त सुशील राठोड विश्वस्त राजेंद्र वाशिंबेकर ,विश्वस्त ॲड. शिरीषकुमार लोणकर ,मंदिर पुजारी, रोहित पुजारी,

सचिन सोरटे, धनंजय सोरटे उपस्थित होते. प्रशासन अधिकारी महादेव भोसले व्यवस्थापक अशोक गाठे उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *