
करमाळा प्रतिनिधी
वेताळवाडी ता.माढा जि.सोलापुर येथील पाहिल्या ओबीसी बांधवासाठी सुरु केलेल्या “मोदी आवास योजनेच्या” घरकुलाचा शुभारंभ.

ओबीसी संवर्गातील घरकुलापासून वंचित लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोदी घरकुल आवास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजेअंतर्गत वेताळवाडी ता.माढा येथे ११ घरकुल मंजूर झाले आहेत.

लाभार्थी संजय राऊत यांच्या घरकुल पायाभरणीचा शुभारंभ सरपंच रतन सुरवसे, ग्रामसेवक मनिषा शेंडेकर, नाभिक समाजाचे प्रदेश युवक अध्यक्ष तथा भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य सुधिर भाऊ गाडेकर, सरपंच रजनीताई सुरवसे, ग्रामपंचायत

सदस्य सुनिता सुरवसे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष बापु सुरवसे, ऊपसरपंच शहाजी सुरवसे, सरपंच प्रतिनिधी रामभाऊ राऊत, वैजिनाथ राऊत, पोपट राऊत, बाळु राऊत, अक्षय राऊत, मोहन गाडेकर यांचे शुभहस्ते करण्यात आला.


