
करमाळा प्रतिनिधी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला प्रशिक्षण अभियान संस्था, करमाळा व ज्ञानज्योती ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांना रोजगार मिळावा म्हणून रोजगार प्रोत्साहित प्रशिक्षण मिळावे यासाठी १५ दिवसाचे शिवणकाम व फॅशन

डिझायनिंग चे मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 23/12/2023 रोजी प्रशिक्षणाचे उद्घाटन शितल करे मॅडम, गणेश करे सर यांच्या हस्ते यशकल्याणी सेवाभवन येथे पार पडले तरी पुढील १५ दिवस मोफत प्रशिक्षणाचा लाभ

महिलांनी घ्यावा असे आवाहन प्रशिक्षणाचे प्रशिक्षक निशिगंधा अनिल शेंडे यांनी केले आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. उद्घाटन वेळी राऊत मॅडम, राऊत सर, मोहोळर मॅडम, नाळे मॅडम, पेणकर मॅडम, योगिता पाटील,

मंदा पेठकर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रशिक्षण अभियान संस्थेचे अध्यक्ष निशिगंधा अनिल शेंडे मॅडम व अनिल शेंडे सर उपस्थित होते.

