करमाळ्याची लेक तृप्ती साखरे-सरोदे यांची महिला राष्ट्रवादीच्या प्रदेश सचिव पदी निवड..करमाळ्यात निवडीचे स्वागत.!

करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागात असणाऱ्या राजुरी गावची लेक सौ.तृप्ती साखरे-सरोदे यांची महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री अजित दादा पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष खा श्री सुनीलजी तटकरे साहेब , राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. श्री प्रफुल भाई पटेल आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा व महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते पत्र देऊन निवडीचे पत्र देऊन महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिवपदी सौ. तृप्ती साखरे-सरोदे यांची निवड करण्यात आली. राजकारणाची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सामाजिक कार्याच्या

माध्यमातून समाजहिताची कामे करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना सुरुवातीलाच सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती .निवडीनंतर दोन वर्षे सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी समर्थपणे सांभाळल्या नंतर सौ.तृप्ती साखरे-सरोदे यांनी आपल्या सासरी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये हिरकणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून तसेच परत पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून तालुक्यातील महिलांच्या आरोग्याचे,सुरक्षेचे,बचत गटाचे विविध प्रश्न,विजेचे प्रश्न ,MIDC चे प्रश्न सोडवायला सुरवात केली व यामाध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत महिलांचे संघटन जोडले जाऊ लागले.

याचीच दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर ,महिला बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांच्या माध्यमातून तृप्ती साखरे-सरोदे यांची महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली.
सामान्य घरातील कार्यकर्ता ते प्रदेश पातळीवर सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल करमाळा तालुक्यातील सामान्य लोकांनी, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी व राजुरीकरांनी निवडीचे स्वागत केले .

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *