
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका एज्यूकेशन सोसायटीचे विश्वस्त तथा भाजपाचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप यांच्या संकल्पनेतून मा. आ. जयवंतराव जगताप यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमीत्त ‘भव्य आंतरशालेय डान्स स्पर्धेचे’ खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते दि. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता उद्घाटन करण्यात आले. या

उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, जेष्ठ विधीज्ञ ॲड. कमलाकर वीर, तानाजीबापू झोळ, डॉ. श्रीराम परदेशी, गणेश चिवटे, जगदीश आगरवाल, सुहास घोलप, कुंभार, घोरपडे, बाजार समिती संचालक नागनाथ लकडे, आण्णासाहेब पवार, शिवाजी राखुंडे, वालचंद रोडगे, बाजार समिती सचिव विठ्ठल क्षिरसागर, सहसचिव रविंद्र उकिरडे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष

जनार्दन नलवडे, पो.नि. गुंजवटे, गट शिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, जोतीराम ढाणे, रामभाऊ ढाणे, पै. अफसर जाधव, शहाजी शिंगटे, देविदास वाघ, संदिप शेळके, अनिल पिंपरे, निखील ढावरे, पत्रकार आण्णा काळे, विशाल घोलप, जयंत दळवी, सचिन जव्हेरी, सिद्धार्थ वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष

शंभूराजे जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्र. प्राचार्य अनिस बागवान यांनी प्रास्ताविक केले. या स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक नृत्य प्रकार सादर करण्यात आले. पारदर्शी मुल्यमापना करिता कोडींग पद्धत अवलंबली होती. या स्पर्धेत तालुका भरातून लहान व मोठ्या गटातून ४१ सामुहिक व वैयक्तिक नृत्य प्रकार सादर करण्यात आले. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ, देश

रंगीला, लावणी नृत्य, रिमिक्स गाण्यावरील नृत्य, कथ्थक नृत्य, लावणी, देवीच्या गाण्यावरील नृत्य, राजस्थानी नृत्य, भारतीय संस्कृती चे दर्शन घडवणारे नृत्य तसेच पाश्चिमात्त्य नृत्य प्रकार सादर करण्यात आले. या स्पर्धेसाठी रिल्स स्टार व यु ट्यूब स्टार विक्रम आलाट, मदार चित्रपटाचे कास्टींग डिरेक्टर निलेश भुसारे, डान्स मास्टर अक्षय कांबळे यांनी परीक्षक

म्हणून काम पाहिले. या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा देशभक्त कै. नामदेवराव जगताप यांच्या जयंती निमित्त बक्षिस वितरण समारंभ संपन्न होणार आहे. या स्पर्धेला जोडूनच दि. १२ डिसेंबर रोजी ‘ सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये म. गांधी प्री-प्रायमरी इंग्लीश मीडीयम स्कुल च्या चिमूकल्यांनी तर अक्षरक्षा: उपस्थितांची मने जिंकली. म. गांधी विद्यालय, तांत्रिक विद्यालय व ज्यूनियर कॉलेज ऑफ सायन्स या सर्व युनिट मधील विद्यार्थ्यांनी अप्रतीम सादरीकरण केले. शहर व तालुक्यातील पालक व रसीक श्रोत्यांनी या भरगच्च कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. या कार्यक्रमासाठी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला. न. पालीकेचे फायर ब्रिगेड सुद्धा तैनात होते. कृटीर रुग्णालयाने आपतकालीन व्यवस्थेचा भाग म्हणून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. एम.एस.ई.बी. ने ही अखंडीत वीज पुरवण्याचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय पवार, निवेदक सचिन नवले व प्रा. दत्तात्रय भागडे यांनी आलटून-पालटून केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्र.प्राचार्य अनिस बागवान, जेष्ठ पर्यवेक्षक बी.के. पाटील, पर्यवेक्षिका सुनिता नवले, विज्ञान शाखा विभाग प्रमुख व्ही.एल. पवार, सर्व सहशिक्षक, सहशिक्षीका, शिक्षकेत्तर कर्मचारी व किंग्ज ग्रुपचे सदस्य यांनी सहकार्य केले.