
करमाळा प्रतिनिधी
केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा करंजे या ठिकाणी क्रीडा स्पर्धा २०२३-२४ मध्ये घारगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने घवघवीत यश मिळवले आहे. यामध्ये कबड्डी मोठा गट मुले – प्रथम क्रमांक, कबड्डी मोठा गट मुली – प्रथम क्रमांक ,लंगडी मोठा गट मुले – प्रथम क्रमांक, लंगडी मोठा गट मुली – प्रथम क्रमांक ,१०० मी धावणे कु.आरती आप्पासाहेब गायकवाड – प्रथम क्रमांक,२०० मी धावणे – कु.आरती आप्पासाहेब गायकवाड – प्रथम क्रमांक, २००मी धावणे – कु ऋतुजा श्रीकांत शिंगटे – द्वितीय क्रमांक, १००मी धावणे : संग्राम विठ्ठल कांबळे – प्रथम क्रमांक,

बुद्धिबळ स्पर्धा – मोठा गट : करण महादेव मस्तुद- प्रथम क्रमांक, बुद्धिबळ स्पर्धा – लहान गट: पृथ्वीराज विलास चव्हाण प्रथम क्रमांक असे घवघवीत यश घारगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवले आहे. क्रीडा मार्गदर्शक म्हणून चव्हाण सर, जाधवर, पाटील मॅडम, खान सर, बुधवंत सर आणि कुलकर्णी सर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.

आपणासर्वांचे खूप खूप अभिनंदन व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा यावेळी जिल्हा परिषद शाळेत जाऊन घारगाव च्या विद्यमान सरपंच लक्ष्मी संजय सरवदे, उपसरपंच सतीश पवार, माजी सरपंच लोचना काकू पाटील, ग्रामपंचायत सदस्य आशा

काकू देशमुख, कविता होगले, दत्तात्रेय मस्तद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल सरवदे, उपाध्यक्ष किसन पवार व

शाळा व्यवस्थापन समितीचे इतर सदस्य आणि ग्रामस्थ यांनी सर्व शाळेतील विद्यार्थ्यांचे खेळाडूंचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या