मंदिराची  परराज्यातून महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविक भक्तांना माहिती होण्यासाठी.

करमाळा शहराला जोडणाऱ्या  इतर जिल्ह्यातून येणाऱ्या मुख्य रस्त्यांवरती प्रवेश करण्या अगोदर 2/3 किलोमीटर वरती चारही दिशेला भव्य कमानी उभारण्यात याव्या, कमला भवानी माता मंदिराकडे जाण्याचा मार्ग व मंदिर ट्रस्ट कडून  भाविकांना देण्यात येणाऱ्या सुख सुविधांचा सविस्तर त्या  कमानी वरती उल्लेख करावा.  कमला भवानी  म्हणजे चारही दिशेकडून प्रवास करणाऱ्या भक्तांना आपल्या मंदिराविषयी माहिती मिळेल आणि ते नक्कीच दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये येतील.. तीर्थक्षेत्र पर्यटनासाठी अतिशय सुबक व सुंदर, आकर्षक असे हे कमला भवानी मातेचे भव्य दिव्य राजे रावरंभांनी बांधलेले मंदिर.

अजूनही महाराष्ट्रासह इतर राज्यातील  लोकांना एवढं परिचित नसल्यामुळे व अपुऱ्या सुखसुविधांमुळे भाविक भक्त अजून पर्यंत  मोठ्या प्रमाणात येऊ शकत नाहीत..

मुख्य म्हणजे आपल्या करमाळा शहराला चार जिल्ह्यातून प्रमुख मार्ग येत आहेत यामध्ये अहमदनगर, धाराशिव, पुणे, सोलापुर या प्रमुख मार्गावरती कमला भवानी मातेच्या मंदिराची कोणतीही माहिती दिशादर्शक फलक नसल्यामुळे.

शिर्डी, गाणगापूर,  तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर, राशिन..

या तीर्थक्षेत्राला जाणारे भाविक भक्त करमाळा शहरा बाहेरूनच पुढे जातात…

तरी मी या माध्यमातून  कमलाभवानी माता मंदिर ट्रस्ट व करमाळा शहरातील दानशूर व राजकीय व्यक्तींना आवाहन करत आहे की, या सर्वांनी मिळून या कामाला सहकार्य करावे……

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *