
युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी केशव चोपडे
करमाळा प्रतिनिधी

करमाळा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नुतन तालुका अध्यक्षपदी केशव चोपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात आपण भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल असे नमूद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अँड गणेश पाटील यांनी केले आहे व निवडीचे पत्र चोपडे यांना दिले आहे निवडी नंतर त्यांच्या वीट येथील गावी व परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे