
जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल मध्ये संस्थेच्या आधक्षांचा वाढदिवस मोठ्या उत्सवात साजरा
भैरवनाथ प्रतिष्ठान संचलित जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल झरे येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश बिले यांचा 74 वा वाढदिवास मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांच्या मध्ये खूप उत्साह होता. या कार्यक्रमाची सुरुवात प्रवेश द्वारा पासून झाली मुलांनी टाळ्या वाजवून, फटाके फोडून व फुलांची उधळण करून बिले सरांचे स्वागत केले. नंतर फेटा बांधून, श्रीफळ देवून,हार घालून व गिफ्ट देऊन शिक्षकांची वतीने शाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब खराडे यांनी जयप्रकाश बिले सरांचा मोठा सन्मान केला. तसेच संस्थेचे खजिनदार सौ. आशा बिले यांचा ही सन्मान शाळेच्या आदर्श शिक्षिका नम्रता साळुंके यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जयप्रकाश बिले सरांनी मुलांना व शिक्षकांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले व शिक्षकांना आवाहन करत जर तुम्ही आपल्या शाळेचा विद्यार्थी सैनिक स्कूल किंवा नवोदय स्कूल ला बसवला तर माझ्या काढून आर्धा तोळ्याची आंगठी बक्षीस देईन असे जाहीर केले. वाढदिवसाचा कार्यक्रम हा एक मुलांसाठी व शिक्षकांसाठी एक मेजवानीच ठरली. याप्रसंगी संस्थेचे सचिव युवराज बिले, संचालिका डॉ. स्वाती बिले उपस्थित होत्या व त्यांनी मुलांना व शिक्षकांना खाऊ देऊन कार्यक्रमाचा शेवट गोड केला. असा हा आनंदी सोहळा उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी खूप मेहनत घेतली.
