करमाळा प्रतिनिधी 

           करमाळा येथील औद्योगिक वसाहतीत करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये निवडुन आलेले लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार समारंभ पुणे शहर काँग्रेस कमिटीचे शहरं उपाध्यक्ष उद्योजक हाजी उस्मानशेठ

तांबोळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी, केम ग्रामपंचायत चे उपसरपंच सलमान मुलाणी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सागर दौंड, कंदरचे उपसरपंच अमोल भांगे, ग्रामपंचायतचे सदस्य

रशीद शेख, महावीर तळेकर, माजी उपसरपंच अखलाख जहागीरदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार, आतीक बेग, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

यावेळी बोलताना तांबोळी म्हणाले की, करमाळा तालुक्यात मुस्लिम समाजाचे बांधव सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी प्रमुख पदावर विराजमान होत आहे. हे एक समाज बांधवांसाठी कौतुकास्पद बाब आहे.

कंदर ग्रामपंचायत चे मौला साहेब मुलाणी (सरपंच कंदर ग्रा.पं.), अमर तात्या भांगे (उपसरपंच कंदर ग्रा.पं.) अखलाख जहागीरदार (मा. उपसरपंच), दुल्हेखान शेख (ग्रा.पं. सदस्य), दिलदार मुलाणी (ग्रा.पं. सदस्य), इकबाल हवालदार (ग्रा.पं.सदस्य) यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सुलतान रमजान मुलाणी उपसरपंच केम, अच्युत काका पाटील, सागर राजे दौंड, महावीर आबा तळेकर, महेश तळेकर, गोरख काका पारखे, विजयसिंह ओहोळ, सागर कुर्डे, शरद वैभासे तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आभार युवा नेते अमीरशेठ तांबोळी यांनी मानले.

चौकट

केम ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल हाजी उस्मान शेठ तांबोळी व हाजी अल्ताफ शेख तांबोळी यांनी सत्कार केला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *