करमाळा प्रतिनिधी

आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सभासदांचा आहे कारखाना तोट्यात चालवण्यापेक्षा बंद करा अशी सभासदाची इच्छा आहे अशी माहिती ज्येष्ठ शेतकरी सभासद दत्तू भगवान गिरमकर यांनी सांगितले आहे.

कारखान्यावर बोजा करू नये. येथे कुणीतरी येते आणि बोलायच कारखान्यावर काहीतरी करतोय असे दाखवायचे पण नियोजन योग्य होत नाही.

दोन वेळा बागलांच्या काळामध्ये कारखाना वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. तीच आता होऊ नये बागलांनी कुठे पैसा खर्च केला किंवा नाही केला हे सर्वांना माहीत आहेच परत तसे होऊ नये एवढीच इच्छा आहे. कर्ज वाढु नये कारखाना बंद करून

टाकावा आहे एवढं माझं मत आहे. मी ज्येष्ठ सभासद आहे. सुरूवातीपासून मला माहित आहे कोणी वाटोळ कारखान्याचे केल, कोणी चांगल केल, त्यामुळे कारखाना योग्य पध्दतीने चालवता येत नसेल तर बंद करा असे सभासद दत्तू भगवान गिरमकर यांनी सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *