सोलापूर दि.24 (जिमाका ) :-  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनां व प्रस्तावित योजना याबाबत माहिती दिली.  तसेच योजनांचा  लाभ घेण्यासाठी  व्यवसाय निवड करताना, नवीन व नाविन्‍य पूर्ण व्यवसाय निवडीबाबत मार्गदर्शन करुन महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे यांनी केले.

                साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह,सोलापूर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी सांगळे बोलत होते.  यावेळी  मेळाव्याची सुरुवात मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन व महापुरुषांना अभिवादन करुन करण्यात आली.  शाहीर नंदू पाटोळे  यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला गाणे सादर केले.  सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत एल.ए. क्षिरसागर, जिल्हा व्यवस्थापक, धाराशिव व आर.एच. चव्हाण, जिल्हा व्यवस्थापक, सोलापूर यांचेवतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.          

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन माजी राज्यमंत्री  उत्तम प्रकाश खंदारे व अनिल रा. म्हस्के, महाव्यस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (म), मुंबई हे उपस्थित होते. तसेच मेळाव्यासाठी जिल्हा सोलापूर व धाराशिव येथील समाजबांध, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

                व्यवस्थापकीय संचालक सांगळे यांनी  महामंडळाचा पदभार स्विकारल्यापासून केलेल्या कामकाजाचा आढाव सादर केला.   शासनाने महामंडळास ता. तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे उपलब्ध करून दिलेल्या जमिन /जागेवर सुरू करण्यात येणाऱ्या युपीएससी/ एमपीएससी सेंटर व बहुउपयोगी प्रशिक्षण केंद्राबाबत उपस्थितांना  मौल्यावान मार्गदर्शन केले.

                                माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी बऱ्यांच बाबीवर प्रकाश टाकून महामंडळाच्या कामकाजामध्ये काही बदल करण्याबाबत सुचना केलेल्या आहेत, तसेच महामंडळाच्या कार्यात सदैव सोबत राहून महामंडळाच्या अडीअचणी, राजकीय बाजूने शासन दरबारी मांडणार असल्याची ग्वाही या प्रसंगी दिली.

                प्रमुख पाहुणे अनिल रा. म्हस्के, महाव्यस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (म), मुंबई यांनी महामंडळामार्फत पुर्वी राबविण्यात येत असलेल्या साहित्यरत्न लोकशाहिर आणाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनू मध्ये  बदल करून देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर रक्कमेत देखील मोठयाप्रमााणात वाढ करण्यात आल्याची माहिती दिली.    तसेच एनएसएफडीसी योजना व त्यासाठी आवश्यक असलेली खंडहमी मिळणेसाठी व सर्व सुरू  असलेल्या योजना व प्रस्तावित योजनां प्रभावी पणे सूरू राहण्यासाठी शासन दरबारी  पाठपुरावा सुरू असल्याबाबत माहिती दिली. 

                प्रस्ताविक भाषण प्रादेशिक व्यवस्थापक शि.ल. मांजरे, तद्दनंतर सामाजिक कार्यकर्ते सतिश कसबे, धाराशिव,  युवराज पवार, सोलापूर,  सुनिल अवघडे, सोलापूर,  विलास लोंढे, सोलापूर,  प्रमिला झोंबाडे, सोलापूर,  लखन गायकवाड, सोलापूर,  राजन घाडगे, सोलापूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  तसेच मनोगतामध्ये प्रामुख्याने जामिनदारांची अट शिथिल करण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे. तसेच महामंडळाचे लाभार्थी यशस्वी उद्योजक शंकर मोरे, धाराशिव व बालाजी खंदारे, सोलापूर यांची त्यांचे यशाबद्दल महामंडळाच्या योजनेबद्दल मनोगत व्यक्त केले.

                कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एल.एल. क्षिरसागर जिल्हा व्यवस्थापक  धाराशिव यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भैरवनाथ कानडे सहशिक्षक  चिकुंद्रा ता. तुळजापूर यांनी करून कार्यकमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *