
करमाळा प्रतिनिधी
तंटामुक्त क्षेत्रात, स्वच्छ्ता हीच सेवा या कामात झोकून दिले, स्वच्छतेमध्ये ‘वेंगुर्ला पॅटर्न’ तयार केला, प्लास्टिक बॅग मुक्ती, घाणकचऱ्यापासून वीज निर्मिती आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल वसुंधरा मित्र पुरस्कार, UNDP, आयकॉन अवॉर्ड, इंडीयन गलोरी अवार्ड, यंग रिसर्चर अवॉर्ड असे 40 हून अधिक पुरस्कार मिळाले, परंतु आज करमाळा तालुका फ्रेंड सर्कल कडून

पुरस्कार मिळालेला आनंद खूप आहे, असे रामदास कोकरे म्हणाले. करमाळा तालुका फ्रेंड सर्कल चा तिसरा स्नेहमेळावा संपन्न झाला. यावेळी करमाळा तालुक्यातील सर्व अधिकारी, उद्योजक, शिक्षण क्षेत्रातील आणि शेतकरी उपस्थीत होते. यावेळी लातूर नगरपरिषद प्रशासन आयुक्त रामदास कोकरे यांना करमाळा मित्र पुरस्कार पणनचे सहसंचालक मोहनजी निंबाळकर, सचिन शहा, बारामतीचे चीफ ऑफिसर महेशजी रोकडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी करमाळा

तालुका फ्रेंड सर्कलच्या वतीने शालेय पोषण आहार अधिकक्षक संतोष फाटके, विकास सरडे, ॲड. सुहास मोरे, राज्यकर अधिकारी सुधीर आडसुळ यांच्या हस्ते 14 सायकलीचे मुलींना वाटप करण्यात आले. समर्पण कादंबरी लेखक महेद्र पेटकर, चित्रपट निर्माता मंगेश बदर, चार्टर्ड अकाउंटंट भरत जाधव, सॉफ्टवेअर इंजिनियर क्षितिज भोसले, मागील वर्षी mpsc आणि upsc मध्ये यशस्वी झालेल्यांचे सत्कार करण्यात आला. एवरेस्ट सर केलेले शिवाजी ननावरे, API pune यांचाही सत्कार

झाला. शिक्षण क्षेत्रातील प्रा. मालोजीराजे भोसले, श्रीकांत भोसले, लक्ष्मण राख, रणजित जाधव, उद्योजक राहुल यादव, सुनील यादव , उमेश पवार, संजय भालेराव, शशिकांत शेजुळ, ॲड सचिन लोंढे, डॉ. मयूर नवले, जयंत देशमुख, सुरेश भोसले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राज्यकर आयुक्त संतोष लोंढे, पोलिस निरिक्षक सचिन वांगडे, उपजिल्हाधकारी रामहरी भोसले, राजेंद्र वारगड यांनी केले होते. यावेळी आभार प्रदर्शन ॲड. सुहास मोरे आणि सूत्र संचालन नितीन आढाव पाटील यांनी केले.
