
करमाळा प्रतिनिधी
महात्मा फुले चौकात रोजच अपघात होत आहेत. या रस्त्यावर शाळकरी विद्यार्थी, क्लासेसचे विद्यार्थी रोज ये-जा करतात. या रस्त्यावरून टू व्हीलर, फोर व्हीलर, एसटी, ट्रक, टेम्पो हे फास्ट जातात यामुळे रस्त्यावर छोटे-मोठे अपघात रोजच होतात.

त्यातील एक जण प्रदीप शिंदे यांचा अपघात होऊन ते सध्या दवाखान्यात अॅडमिट आहेत. या रस्त्यावर गतिरोधक करावे अशी मागणी टाऊन हॉल शॉपिंग सेंटर वरील सर्व दुकानदार व ग्रामस्थ यांनी केली आहे.


