वाशिंबे प्रतिनिधी

वाशिंबे ग्रामपंचायतीच्या वतीने पंधरावा वित्त आयोगा अंतर्गत गावातील 20 सार्वजनिक ठिकाणी दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर सरपंच तानाजी बापू झोळ याच्या मार्गदर्शनाखाली सौरऊर्जेवर चालणारे दिवे बसवण्यात आले.

याचा शुभारंभ सोमवार ता. १३ रोजी वाशिंबे येथील ह.भ.प. धनाजी जगदाळे यांच्या हस्ते श्रीफळ वाहून करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उपसरपंच अमोल पवार, ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील, धोंडीराम कळसाईत, श्रीहरी

टापरे, राहुल शिंदे तसेच मनोज झोळ, आनंद झोळ, शैलेश झोळ, हनुमंत निंभोरे, निलेश कुलकर्णी, गणेश पाटील, देविदास राऊत, अशोक ननवरे, आदी इतर मान्यवर व ग्रामस्थ  उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *