करमाळा प्रतिनिधी

श्री जगदंब देवी बहुउद्देशीय संस्था आणि अन्नछत्र मंडळ देवीचा माळ यांच्या वतीने राज्यस्तरीय श्री कमलाई देवी गौरव पुरस्कार यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे सर्वेसर्वा प्राध्यापक गणेश करे पाटील यांना समारंभ पूर्वक देण्यात आला.

    देवीचा माळ येथे राजेराव रंभा तरुण मित्र मंडळाने आयोजित केलेल्या कमलाई फेस्टिवल 2023 या समारंभाच्या वेळी तसेच बक्षीस वितरणाच्या समय हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, बालरोग तज्ञ डॉक्टर कविता कांबळे मॅडम, संस्थेचे अध्यक्ष नवनाथ दादा सोरटे, सरपंच महेश सोरटे, उपसरपंच दीपक थोरबोले, प्राचार्य बाळासाहेब नरारे, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी श्रीकांत चव्हाण (म.न.वि.से. ता.अध्यक्ष करमाळा), सचिन चोरमुले (तंटामुक्त अध्यक्ष श्रीदेवीचामाळ), श्रेणिकशेठ खाटेर (सामाजिक कार्यकर्ते), प्रशांतशेठ ढाळे (मा. नगराध्यक्ष),

हन पवार, नवनाथ (भैय्या) सोरटे,प्रतिक चव्हाण (आईसाहेब ॲटोमोबाईल्स & गॅरेज), केतन काश्विद (शिवांश हेअर स्टाईल), संतोष वारे (ता.अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस) अमोलशेठ चव्हाण (सदस्य ग्रा.पं.), अक्षय बेंद्रे (कमलाई फॅब्रिकेशन), संतोष पवार (सदस्य ग्रा.पं.), आदि मान्यवर उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *