करमाळा प्रतिनिधी

क्रीडा युवक सेवा संचनाने महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर आयोजित विभाग स्तरीय शालेय उशू स्पर्धा दिनांक 20 ऑक्टोंबर व 21 ऑक्टोबर,* रोजी जामखेड अहमदनगर जगदंबा मंगल कार्यालय या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत दत्तकला इंटरनॅशनल स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची यश. 

विजेते विद्यार्थी अजय दिगंबर  तिरेकर इयत्ता अकरावी सायन्सचा विद्यार्थी 19 वर्षाखालील 40 ते 45 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक, वैष्णवी तुषार मोहिते इयत्ता अकरावी सायन्स ची विद्यार्थिनी 19 वर्षाखालील 52 ते 56 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक, श्रावणी नंदकिशोर पाटील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी 17 वर्षाखालील 45 ते 48 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक.

या सर्व विजेते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दत्तकला शिक्षण संस्थेचे क्रीडा शिक्षक प्रदीप सुनील शिवपुजे सर यांनी केले.

तसेच प्रथम आलेल्या दोन विद्यार्थ्यांची निवड दिनांक 27 ऑक्टोबर 2023 ते 29 ऑक्टोबर 2023 अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन या सर्व विजेते विद्यार्थ्यांना शुभेच्छा दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ सर, उपाध्यक्ष राणादादा सूर्यवंशी, सचिवा माया झोळ मॅडम, प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर सर, (स्कूल ऑफ डायरेक्टर), प्राचार्य नंदा ताटे मॅडम एस.एस.सी. व जुनिअर कॉलेज प्राचार्य सिंधू यादव मॅडम, विभाग प्रमुख प्रा. खाडे मॅडम, प्रा. धर्मेंद्र धेंडे सर व सर्व शिक्षक वृंदावन यांनी विजेते विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *