
करमाळा प्रतिनिधी
भोंडला नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतो आणि तो कोजागिरी पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो. इतर भारतीय सणांप्रमाणेच भोंडला हा सण निसर्गाशी जोडलेला आहे आणि हस्त नक्षत्राच्या पावसानंतर चांगला पिके घेऊन साजरा केला जातो. एक प्रकारे मानवजातीला समृद्धीचे आशीर्वाद देणार्या निसर्गाला धन्यवाद देणारा हा विधी आहे.

नवरात्री निमित्त स्नेहालय स्कूल मध्ये १९ तारखेला भोंडला, गरबा, दांडियाचे आयोजन केले होते. या मध्ये स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यानी दांडिया चा पेहराव केलेला होता. गरबा दांडिया तसेच फेर धरून मुलांनी खूप छान प्रकारे कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. फेर धरून फुगड्या खेळून मुलांनी विविध प्रकारच्या गाण्यांवर ठेका धरला. खूप उत्साह पूर्ण वातावरणात मुलांनी आनंद लुटला.

या प्रसंगी मुख्याध्यापिका धनश्री दळवी, सहशिक्षिका शुभांगी खळदकर, शिवांगी शिंदे, अमृता पाटील, त्रिवेणी दळवी, रुपाली जगताप, अश्विनी महामुनी, सविता पवार, अंजुम कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
