
केंद्र शासनाकडून टेंभुर्णी ते करमाळा या महामार्गाच्या फायलीवर मंजुरीची अंतिम सही झाली आहे- गुलाबराव बागल
करमाळा प्रतिनिधी
केंद्र शासनाकडून टेंभुर्णी ते करमाळा या महामार्गाच्या फायलीवर मंजुरीची अंतिम सही झाली आहे. अशी माहिती ज्येष्ठ नागरिक गुलाबराव बागल यांनी सांगितले आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी करमाळ्याचे सुपुत्र मा. केंद्रीय मंत्री संजयजी धोत्रे साहेबांचे पर्सनल सेक्रेटरी श्री प्रतीक नाथाजी शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांचे ओएसडी श्रीयुत दिपक शिंदे साहेब (आय ए एस )यांची समक्ष भेट घेतली माहिती मिळवली.. शिंदे साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे या महामार्गाच्या एल वन फाईल वर मंजुरीची सही झालेली आहे आणि येत्या चार आठ दिवसात एल टू फाईल वर सुद्धा सही होऊन जाईल. त्यानंतर लगेच डिसेंबर पर्यंत रस्त्याचे काम सुरू झालेले दिसेल असेही सांगितले.
आपल्या जवळूनच चेन्नई सूरत महामार्ग जात असल्यामुळे बरेचसे ट्रॅफिक विशेषतः जड वाहनाचे त्या मार्गावर जाईल त्यामुळे आपल्या या टेंभुर्णी जातेगाव महामार्गाचे महत्व कमी झाले आहे.त्यामुळे या महामार्गासाठी ठेकेदार मिळणे अवघड झालेले आहे त्यामुळे शासनाने या महामार्गाचे 60 मीटरचे भूसंपादन कमी करून 45 मीटर केलेले आहे मांगी ,करमाळा बायपास( नगरपालिका हद्द वगळून) व कंदर ते टेंभुर्णी येथील चार गावे वगळता बाकी सर्व गावांचे 45 मीटरचे भूसंपादन यापूर्वीच सुप्रीम कंपनीच्या काळात झालेले आहे त्याचा मोबदलाही बाधित शेतकऱ्यांना व संबंधितांना मिळालेला आहे राहिलेल्या गावांची भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल असेही त्यांनी सांगितले.ज्या ठिकाणी महामार्गाचे 45 मीटरचे भूसंपादन झालेले आहे त्या ठिकाणी रस्त्याचा मध्य काढून खिळे ठोकण्याचे व खिळ्याभोवती पिवळी वर्तुळे काढण्याचे कामही सुरू झालेले आहे(जातेगाव हद्दीत)त्यामुळे या महामार्गाचे काम त्वरित पूर्ण होईल याची खात्री बाळगायला हरकत नाही..या महामार्गाच्या कामाच्या मंजुरीसाठी मी स्वतः श्री प्रतीक शिंदे यांचे संपर्कात सतत असे प्रतीक शिंदे यांनीही आपल्या तालुक्याचे काम करण्याचे मनावर घेतले 60 मीटर भूसंपादन झाले असते तर मिळणारा मोबदला कमी झाल्यामुळे काहींची निराशा झाली हे खरे असले तरी हा महामार्ग होणे महत्त्वाचे आहे व तो होतो आहे या महामार्ग मंजुरीचे कामी गडकरी साहेबांचे स्विय सहाय्यक अमोल बिराजदार साहेब व मंगेश चिवटे आणि इतर अनेक जणांचे सहकार्य लाभले आहे गुलाबराव बागल
जिजाऊ, बायपास रोड करमाळा
mbl 9767764040 9423334040