
वारे यांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळे
करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस नेते खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी सदिच्छा भेट दिली.

सध्या खासदार सुप्रिया सुळे या राज्यभर राष्ट्रवादी पक्षाच्या वाढीसाठी दौरा करत असून असून, रविवारी त्या सोलापूर दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी कुर्डूवाडी येथे रात्री सभा घेतली. ही सभा झाल्यानंतर त्यामध्ये जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष वारे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी माझी जिल्हा परिषद सदस्य राणी वारे यांनी सुप्रिया सुळे यांचे स्वागत केले.

करमाळा तालुक्यात सध्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना एकत्र करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर काम करण्याची भूमिका घेतली आहे.
