सोलापूर, दिनांक 9(जिमाका):-सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सर्वत्र शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी. तसेच समाजकंटक व गुंड प्रवृत्ती इसमावर प्रतिबंधक कारवाई करणे सोयीचे जावे, यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी च्या रात्री 8 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3)आदेश लागू करण्यात येत असल्याची माहिती अपर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली आहे.

      या आदेशाच्या कालावधीत पाच किंवा पाच गुण जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात येत आहे. हा देश अत्यावश्यक सेवा, सरकारी कामकाज बजावणाऱ्या यंत्रणा लागू होणार नाही. तसेच ज्या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक ग्रामीण व उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी पूर्व परवानगी दिली आहे अशा यात्रा स्थळे व तत्सम प्रकरणापुरते लागू होणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *