करमाळा प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं.2 ता. करमाळा येथील शिक्षक बाळासाहेब बोडखे यांचा पद्मश्री पोपटरावजी पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने 5 सप्टेंबर रोजी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार 2022-23 चे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं.2 येथील शिक्षक बाळासाहेब बोडखे हे सोलापूर जिल्ह्यामधून या

पुरस्काराचे मानकरी ठरले होते. त्या अनुषंगाने पोपटराव पवार यांनी बोडखे यांचे विशेष अभिनंदन केले. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडवणे हेही महत्त्वाचे आहे. सर्वांगीण शिक्षणावर भर देतानाच

पर्यावरण जनजागृती आणि संवर्धनाबाबतही बोडखे यांनी आपल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रभावीरित्या उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावर बालवयापासूनच पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता हे नक्कीच दिशादर्शक आहे. ते करत असलेले कार्य हे नक्कीच कौतुकास्पद आहे,  त्यांनी शाळेत राबवलेल्या वेगवेगळ्या पर्यावरण पूरक उपक्रमांची माहिती आदर्श गाव हिवरे बाजार येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना देण्यासाठी बोडखे यांना मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच आमंत्रित करण्याचे पवार यांनी व्यक्त केले. हे उपक्रम पाहून याबाबत महाराष्ट्र शासनाच्या आदर्श ग्राम योजनेचे राज्याचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी बाळासाहेब बोडखे यांचे यापूर्वीही वेळोवेळी कौतुक केले होते.

जसे थेंबाथेंबाने महासागर बनतो त्याच पद्धतीने छोटे छोटे उपक्रम प्रभावी रित्या राबविल्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्याने, मूल्य आपण रुजवू शकतो असे मत बोडखे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत भरीव काम करणारे आदर्श शिक्षक तुकाराम अडसूळ हे उपस्थित होते.

या यशाबद्दल केंद्रप्रमुख महावीर गोरे तसेच शाळेतील शिक्षक किरण जोगदंड यांनी बोडखे यांचे विशेष कौतुक केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *