
करमाळयात पावसासाठी मुस्लिम बांधव करणार उद्यापासून तीन दिवस ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण
करमाळा (प्रतिनिधी)
करमाळा शहरातील मुस्लिम बांधव पर्जन्यवृष्टीसाठी उद्यापासून साधारणता तीन दिवस सामुदायिक नमाज पठण करणार आहे
सोलापूर जिल्ह्यासह करमाळा शहर व तालुक्यात सप्टेंबर उजाडला तरीही वरुण राजाने पाठ फिरवल्याने शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडला आहे.बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाली असून पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.या पार्श्वभूमीवर करमाळा शहरातील मुस्लिम समाज बांधव आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता करमाळा टेंभुर्णी महामार्गावरील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करणार आहे
शहरातील ईदगाह मैदानावर शनिवारी दुपारी दिड वाजताच्या नमाजनंतर करमाळा शहरातील मुख्य धर्मगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली ही सामूहिक प्रार्थना करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांच्या शिवारात भरघोस पाऊस पडावा,कुठेही दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये,जनावरांना चारा-पाणी मिळावे, तलाव, विहिरी आणि धरणे भरून निघावीत आणि संपूर्ण सृष्टीवर अल्लाहची कृपा व्हावी यासाठी मनोभावे दुआ करण्यात येणार आहे.
यावेळी हात वर करून भरल्या डोळ्यांनी पावसाची याचना करण्यात येणार असून.लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी सदर सामुदायिक नमाज पठण या धार्मिक कार्यक्रमाला . शहरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुस्लिम धर्मगुरूंनी (हाफिज) केले आहे
