
सांगोला प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आदर्श शिक्षक, जीवन गौरव व आदर्श लिपिक पुरस्कार सोहळा अक्कलकोट येथील श्री स्वामी महाराज देवस्थानचे कै. कल्याणराव (बाळासाहेब)

पॉलिटेक्निकल कॉलेज, अ.कोट येथे सभागृहात आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याकार्यक्रमात मुख्य अतिथी शिक्षक आमदार जयंतजी आसगांवकर, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी

विश्वस्त अमोलराजे भोसले व शिक्षणाधिकारी नाळे यांच्या शुभहस्ते आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक व लिपिक यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शिक्षक आमदार यांनी संघटनेचे शिक्षकासाठी खूप योगदान असतो. शिक्षकांचे

अनेक प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले. संघटनेच्या नियोजनाचे कौतुक केले. यावेळी सो.जि. मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष महेशजी सरवदे, श्रावण

बिराजदार, भारत इंगवले, मुकुंद साळुंखे, सचिन झाडबुक्के, तुकाराम मेटकरी, मोहन गायकवाड, संभाजी वागज, गणेश यादव, हणपुडे सर, विजय वागमोडे, निलखंठ लिंगे, पिराप्पा कुनगे, जोडबोटे सर, भोसले सर, काशिद सर इ. जिल्हा पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. प्रत्येक तालुक्यातून एक आदर्श शिक्षक तसेच मुख्याध्यापक व लिपिक असे एकूण 16 जणांना पुरस्कृत करण्यात आले. प्रास्ताविक हरिदास जाजनुरे यांनी केले. जिल्हाध्यक्ष भारत इंगवले यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन आर.एस. येणगुरे सर यांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन अक्कलकोट तालुका माध्यमिक शिक्षक संघ पदाधिकारी यांनी केले होते.