
करमाळा प्रतिनिधी
नेरले ता. करमाळा येथील हिंदवी गणेशोत्सव मंडळ दर वर्षी गणेशोत्सव साजरा करतात. परंतु या वर्षी मंडळाच्या सदस्यांनी त्या शिल्लक राहिलेल्या वर्गणीतून सामाजिक काम करत त्या अनुशंगाने या वर्षी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता भविष्यात

पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून नेरले परिसरात एक बोअर घेतला व परिसरात लोकांना बसण्या साठी 4 बाकडे देण्यात आले. या सामाजिक उपक्रमामुळे नेरले पंचक्रोशीत कौतुक होत आहे. असेच इतर ही गणेशोत्सव मंडळाने डीजे,

दारुगोळा,गुलाल व इतर खर्च टाळून आपल्या उपयोगी सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहन या मंडळातील सदस्यांनी केले.

