करमाळा प्रतिनिधी

संस्थेचे अध्यक्ष विद्याभूषण प्रा. रामदास झोळ सर, संस्थेचे उपाध्यक्ष राणा दादा सूर्यवंशी, संस्थेच्या सचिवा माया झोळ मॅडम तसेच दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर यांच्या मार्गदर्शना खाली हिंदी दिवस साजरा करण्यात

आला. विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, यांचा समावेश करण्यात आला होता. सार्थक गव्हाणे, पूजा साखरे, बनिता प्रधान यांनी भाषणे केली. इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या

माध्यमातून हिंदी भाषेचे महत्त्व पटवून दिले. विभाग प्रमुख प्रा. धर्मेंद्र धेंडे यांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाला डायरेक्टर मॅडम नंदा ताटे, प्राचार्य यादव मॅडम, विभाग प्रमुख खाडे मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षिका सारिका केकान यांनी केले. आभार वर्षा झोळ यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *