
गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन कार्यालय उद्घाटन समारंभ
सोलापूर करमाळा
गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन कार्यालय उद्घाटन समारंभ 2 सप्टेंबर 2023 ला पुणे येथे संपन्न झाला आहे.

आयुक्त पशुसंवर्धन कार्यालय येथे झाला आहे, पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सुध्दा कार्यक्रमासाठी आवर्जून होते.

महाराष्ट्रातील सर्व गोशाळा ट्रस्टी, संचालक, गोपालक, गोरक्षक, गोसेवक या सर्वांना आज एक हक्काचे सरकारी कायमस्वरूपी मुख्यालय मिळाले. आता भविष्यात आपल्या देशी गोवंशला पुन्हा ते पुर्वीचे सोनेरी दिवस प्राप्त होणार यात तीळ मात्र शंका

नाही. या प्रसंगी गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा, सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी, डॉ नितीन मार्कंडेय, संजय भोसले प्रभु उद्धवजी नेरकर व्यासपीठावर उपस्थित होते.

