करमाळा भाजपा संपर्क कार्यालयासमोर गोविंदांचा थरार मोठ्या उत्साहात दहीहंडी संपन्न

करमाळा प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी करमाळा तालुक्याच्या वतीने भाजपा संपर्क कार्यालयासमोर भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले

होते,

या दहीहंडी उत्सवात इंदापूर ,अकलूज, बारामती ,पुणे व करमाळा शहरातील गोविंदा मोठ्या संख्येने उपस्थित होते,

या दहीहंडी उत्सवाला माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उपस्थिती ही गोविंदासाठी आकर्षक

ठरली, तसेच या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांच्यासह तालुक्यातील व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. या दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांनी केले होते.संकल्प प्रतिष्ठान इंदापूर या गोविंदा

पथकाने सदर दही हंडी 151111/- रुपयाचे पारितोषिक जिंकले. सदरचे बक्षीस खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते देण्यात आले. भाजपा तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, व्यापार आघाडीचे शहराध्यक्ष

जितेश कटारिया, सोशल मीडिया संयोजक नितीनभाऊ झिंजाडे तसेच सर्व भाजपा पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते. या दहीहंडी उत्सवाला करमाळा शहर व तालुक्यातून युवकांचा जनसागर मोठ्या प्रमाणात

लोटला होता.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *