
करमाळा प्रतिनिधी
शिक्षक दिनाचे औचित्य साधत जेऊर येथील धनंजय वळेकर यांनी विविध शाळांमधील 200 शिक्षकांचा केला सन्मान. माणसाच्या जीवनामध्ये शिक्षकाचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. आयुष्यात यशस्वी झाल्यानंतर नक्कीच माणसाला

आपल्याला ज्ञान दिलेल्या शिक्षकांची पदोपदी आठवण येते. त्यांच्या उतराई होण्याचाही प्रयत्न केला जातो. असाच एक छोटासा प्रयत्न जेऊर ता.करमाळा येथील विमा सल्लागार धनंजय वळेकर यांनी शिक्षक दिनानिमित्त केला आहे. त्यांनी

शिक्षकदिनाचे अवचित्य साधत पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत जेऊर येथिल भारत प्रायमरी स्कूल, हायस्कूल, जुनियर कॉलेज व भारत महाविद्यालय या ठिकाणी शिकवत असलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा कोल्हापुरी फेटा बांधून

सन्मान केला. याबरोबरच असाच सन्मान केडगाव, चिखलठाण तालुका करमाळा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा व निंभोरे येथील संभाजीराजे हायस्कूल व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचांही सन्मान केला आहे. वळेकर हे जीवन

परिसरात 23 वर्षापासून विमा सल्लागार म्हणून काम करतात आपला व्यवसाय सांभाळते सामाजिक कार्यामध्ये ही सक्रिय असतात. याबरोबरच ते विविध उपक्रम ही राबवत असतात. शिक्षक दिना दिवशी परिसरातील 201 शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करून पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षक दिनानिमित्त त्यांनी राबवलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.