करमाळा प्रतिनिधी

भैरवनाथ प्रतिष्ठान संचलित जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल झरे येथे दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. छोटा कान्हा सगळ्यांचे लक्ष वेधत होता. आपल्या गोपिकांच्या सोबत दांडिया खेळत नऊ रसात रंगून गेले. दहीहंडीचा कार्यक्रम सुरू

होताच सर्व मुलांनी एकच जल्लोष केला. रंगबेरंगी कपड्यांमध्ये मुले खूप उठून दिसत होती. दहीहंडी फोडून झाल्याच्या नंतर पाहुण्यांनी मुलांना संबोधित केले. कृष्ण हा फक्त देव नसून सर्व सृष्टीचा सखा असल्याने आपणही त्याचे गुण घेऊन दुसऱ्यांना

मदत केली पाहिजे असा संदेश गौर प्रेमचंद दास व राघवेंद्र दास कृष्ण भक्त गुरुजी यांनी या प्रसंगी मुलांना संदेश दिला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य जयप्रकाश बिले तसेच संस्थेच्या संचालिका डॉ. स्वाती बिले स्वतः उपस्थित

होत्या. जयप्रकाश बिले सर यांनी सुद्धा मुलांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले व पाहुण्यांच्या आभार मानून कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहाय्यक शिक्षक गीतांजली सातव यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे नियोजन केले.

कार्यक्रमासाठी  शाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब खराडे व इतर शिक्षक वृंद यांनी खूप मेहनत घेतली. तसेच बस चालकांनी सुद्धा दहीहंडी बांधण्यासाठी मदत केली व हा बाळ गोपाळांचा सोहळा खूप मोठ्या उत्साहात पार पडला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *