
करमाळा प्रतिनिधी
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी झाली. काही विद्यार्थ्यांनी बाळकृष्ण, वासुदेव, राधा, सवंगडी, गवळणी, ई. वेशभूषा केली होती. दहीहंडीची सजावट विद्यार्थ्यांनी व शिक्षिकांनी केली होती. त्यानंतर काही

विद्यार्थ्यांनी डांस केला तसेच टिपऱ्या खेळले व फेर धरले. त्यानंतर दहीहंडी फोडली.
विद्यार्थ्यांना शिक्षकांचे व पालकांचे मार्गदर्शन लाभले.



