करमाळा तालुका मैदानी स्पर्धेत श्री. गिरधरदास देवी विद्यालयाचे यश.

 करमाळा- येथील श्री. गिरधरदास देवी विद्यालय, करमाळा.प्रशालेने नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय शासकीय पावसाळी मैदानी स्पर्धेत सालाबादप्रमाणे तालुक्यात घवघवीत यश संपादित केले.

 14 वर्षे वयोगटात कु.साक्षी बापू गायकवाड 600 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक, 100 मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक, कु. श्रद्धा सचिन पाटील गोळा फेक चतुर्थ क्रमांक, आर्यन बाळू शिंदे 200 मीटर व 600 मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक, रणवीर शिवाजी टीकोरे गोळा फेक तृतीय क्रमांक.

 17 वर्षे वयोगटांमध्ये कु.रोशनी रवींद्र कांबळे गोळा फेक प्रथम क्रमांक, सहाशे मीटर धावणे स्पर्धेत कु. अस्मिता अनिल सुरवसे तृतीय क्रमांक सर्वच स्पर्धकांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक जितेंद्र शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले सर्व स्पर्धकांचे व क्रीडा

शिक्षकांचे प्रशालेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, सचिव अमोदशेठ संचेती, संचालिका सुनीताभाभी देवी, विजयकुमार दोशी, चंद्रकांत देवी. मुख्याध्यापक संभाजी जगताप सर तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व

पुढील स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *