
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील दक्षिण वडगाव या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये सुरू झाला. या सप्ताह मधली पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ह. भ. प. बाल कीर्तनकार कुमारी ज्ञानेश्वरी दत्तात्रय सुपनवर

यांची झाली. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचे कृपा शिष्य श्री संत निळोबाराय यांच्या अभंगावर कीर्तन झालं. रामायण, महाभारत, भागवत गीता या ग्रंथातील दृष्टांत देऊन भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले. गुरु शिष्य यांचं महत्त्व या कीर्तनातून

त्यांनी भाविक भक्तांना दृष्टांत देऊन सांगितले. या अखंड हरिनाम सप्ताह साठी दक्षिण वडगाव व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गायनाची साथ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायन कोकिळा ह. भ. प. कुमारी योगिता डोंबाळे

महाराज यांनी दिली. पखवाजाची साथ ह. भ. प. शिंदे महाराज भूमकर, टाळकरी, रायगाव, डोंबाळवाडी, वडगाव, खांदेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

