
जेआरडी माझा
मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश भैय्या डोंगरे पाटील मराठा समाज भूषण पुरस्काराने सन्मानित राष्ट्रीय मराठा सेवा संघ प्रणित मराठा वस्तीगृह कक्ष, तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद यांच्या वतीने शिवराज्यभिषेक दिनाच्या निमित्ताने प्रतिभावंत छात्र गौरव पुरस्काराने अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे.

यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश भैय्या डोंगरे पाटील यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम बऱ्हाणपूर मध्यप्रदेश येथे दिनांक 27 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती

मोर्चाच्या माध्यमातुन आपले संघटन कौशल्य शिस्तबद्धता दाखवून देणारे महेश भैय्या डोंगरे पाटील यांचा करण्यात आला. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिवश्री कामाजी पवार तर उद्घाटक म्हणून शिवाजीराजे जाधव संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. अशोक महाराज मोरे (देहू) आदी उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बऱ्हाणपूर मध्य प्रदेशचे खासदार

ज्ञानेश्वर पाटील, मध्यप्रदेश बाल विकास आयोगाचे अध्यक्ष द्राविद्र मोरे, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार आकाश पूंडकर, आयएस ज्ञानेश्वर पाटील, आयुक्त कृषी व लेखा मध्य प्रदेश आयएस सृष्टी देशमुख, जिल्हा परिषद

सिओ ,भैय्यासाहेब रवींद्र पाटील, तेजराव शेळके, रणधिरदादा सावरकर, आबासाहेब पाटील, आनंदराव देशमुख, श्रीरामदादा पाटील, डॉ.सोपान क्षिरसागर, गंगाधर काळकुटे पाटील, इंद्रसेन देशमुख, मनोजकुमार देशमुख, शिवमान श्याम, सुंदर गायकवाड, मानव पाटील, विमान स्वप्निल वानखेडे, शिवमान यशवंत कोरके, शिवमान प्रतिक ठुबे साहेब (IPS), दिनेश शंकरराव कदम आदी उपस्थित होते.