करमाळा प्रतिनिधी

तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समिती, दत्त पेठ तरुण मंडळ व बुद्रानी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 27-8-2023 रविवारी रोजी मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. या शिबिरासाठी पुण्यातून बुद्रानी

हॉस्पिटल चे डॉ. गिरीश पाटील व त्यांची टीम यांनी आलेल्या रुग्णांची तपासणी केली. यावेळेस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध आडत व्यापारी

नवनाथजी सोरटे, मकाई चे नूतन संचालक अमोल आबा यादव, सामाजिक कार्यकर्ते विजयराव लावंड, नगरसेवक सचिन घोलप, भाजप चे जेष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, पप्पूजी उकिरडे, अभिजित दोशी, संतोष किरावे, संतोष दोशी, महेश दोशी, मिलिंद

दोशी, गोसेवा समितीचे सदस्य- जगदीश शिगाजी, नितीन दोशी, दिनेश मुथा, वैभव दोशी यांचे सह सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर उपस्थित होते. यावेळेस बोलताना श्रेणिक खाटेर यांनी मागे आतापर्यंत सुमारे 4500 रुग्णाचे यशस्वी ऑपरेशन

झाले असून भविष्यात ही करमाळा शहर व परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे अहवाहन केले. प्रत्येक महिन्याच्या 27 तारखेला बायपास चौक, देवीचा रोड येथे हे शिबीर होणार आहे असे सांगितले. या प्रसंगी बोलताना अध्यक्ष नवनाथजी

सोरटे यांनी शुभेच्छा देऊन भविष्यात खाटेर यांच्या सामाजिक कार्यास कायम सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. जमीलभाई काझी यांनी पुणे येथील दवाखान्यात खूप चांगल्या सोई असून, स्वछता आहे.ऑपेरेशन खूप छान होतात असे मनोगत व्यक्त केले. भाजप नेते विठ्ठलराव भणगे यांनी खाटेर यांच्या कार्याचे कौतुक करून दत्त पेठ तरुण मंडळाचे त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यात कायम सहकार्य राहील असे आश्वासन दिले. आजच्या शिबिरात अनेक रुग्णांनी लाभ घेतला. या प्रसंगी मकाई सहकारी साखर कारखाना च्या नूतन संचालक पदी निवड झाल्या बद्दल अमोल आबा यादव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिबिरासाठी संतोष भांड, चंद्रकांत काळदाते, विजय बरीदे, गिरीश शाह, कृष्णराज खंडागळे यांच्या सह अनेकांनी कार्यक्रम यशस्वी करण्या साठी प्रयत्न केले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी वर्धमान खाटेर यांनी सर्वांचे आभार मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *