
करमाळा प्रतिनिधी
विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीने करण्यात आलेले होते. या भव्य क्रिकेट

स्पर्धेचे उद्घाटन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे (सर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर विलासरावजी घुमरे सर यांनी खेळाडूंशी हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य

कॅप्टन संभाजी किर्दाक, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मुकुंद साळुंखे, आजिनाथ कारखान्याचे संचालक प्रकाश पाटील, मार्गदर्शक क्रीडा शिक्षक विषयाचे प्रा. राम काळे, प्रा. दीपक ठोसर, प्रा. एस. एस. कांबळे, प्रा. पोपट सरडे आणि खेळाडू

उपस्थित होते. या क्रिकेट स्पर्धेसाठी तालुक्यातील 10 संघ सहभागी झाले होते. त्यापैकी 19 वर्षे मुली यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या संघाने महात्मा गांधी विद्यालय संघाबरोबर आटीतटीच्या सामन्यात 1 गुणांनी विजय मिळवून

तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच 19 वर्षे मुले यशवंतराव चव्हाण महाविद्यालयच्या क्रिकेट संघाने महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेजच्या संघाबरोबर 7 गुणाने विजय संपादन करून

तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच दिनांक 23 व 22 ऑगस्ट 2023 रोजी डॉ. हेडगेवार विद्यालय, गौंडरे या ठिकाणी कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 14 वर्षे, 17 वर्षे आणि 19 वर्षे वयोगटातील 20 संघ सहभागी झालेले होते. यामध्ये 17 वर्ष वयोगटातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मुले संघाने तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.